श्रीपादकृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात गणराज्य दिन उत्साहात संपन्न...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

 दिनांक 26 जानेवारी भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा गणराज्य दिवस महाविद्यालयात व उत्साहाने साजरा करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रा श्री देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले प्राध्यापक डॉक्टर निलेश निंबाळकर यांनी उद्देश पत्रिकेचे सर्वांकडून वाचन करून घेतले. याप्रसंगी महाविद्यालयाची विद्यार्थिनी  कुमारी अरुणा विजय हेरोडे बीए पार्ट 3 हिला  राज्यशास्त्र संशोधन व अध्ययन मंच बुलढाणा द्वारे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल शिल्ड व 501 रुपयाचे बक्षीस व प्रमाणपत्र प्राचार्य डॉक्टर रा श्री देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या ध्वजवंदन कार्यक्रमास महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Previous Post Next Post