धारणी ते ढकणा मार्गांवरील खड्डे बुजावण्याचे काम सुरु असून अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचा आरोप मांडवा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते मुकेश मालवीय यांनी सामाजिक प्रसार माध्यमावर केला असून याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे त्यानि सांगितले आहे.धारणी ते ढकणा मार्गांवर प्रचंड खड्डे पडल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसून येत आहेत.त्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रसारमध्यमानी सतत पाठपुरावा केल्यावर सार्वजनिक बांधकाम उपविभाग धारणी यांनी कामाला सुरवात केली आहे.त्यानुसार काम सुरुही झाले आहे.मात्र खड्ड्यात मुरूम व गिट्टी शिवाय काहीच नाही पुन्हा काहीच दिवसात रस्ता जैसे थर होणार यापूर्वी ही अशीच डागडुजी करण्यात आली होती ती सुद्धा अशीच असल्याने रस्ते जैसें थे झाले. एकदा देयक प्राप्त झाल्यावर कंत्राटदार त्याकडे लक्ष देत नाही.व संबधित विभागाचे अधिकारी व अभियंते कमिशन घेऊन मोकळे होतात.त्रास मात्र त्या रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना होतो. म्हणून मुकेश मालवीय यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
ढाकणा रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम अतिनिकृष्ट..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी