धारणी तालुक्यातील फॉरेस्ट मालूर येथील ग्रामस्थांना व्यक्तिगत, सामूहिक व फॉरेस्ट मालूर या गावाला धारणी तालुकाचा नकाशात समाविष्ट करण्यात यावे, म्हणून ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. फॉरेस्ट मालुर या गावाला वित्त आयोग योजना अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाचे विकासाकरिता देण्यात येणारे निधी तसेच पेसा कायदा अंतर्गत गावाचे विकास करीता येणाऱ्या निधी गेल्या दोन वर्षापासून देण्यात आलेले नाही. ग्रामस्थांनी ग्रामसेवक यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना गाव विकासाचा निधी गावात खर्च करण्याची विनंती गावकऱ्यांनी केली होती. परंतु गावाचे पुनर्वसन झाल्यामुळे शासकीय योजनेचा लाभ देता येत नाही, असे ग्रामसेवक सांगत आहेत. वास्तविकता फॉरेस्ट मालूर गावातील ५० टक्के लोकांचे पुनर्वसन झालेल्या असून ५० टक्के गावकरी पुनर्वसन करण्यास तयार नुसन त्यांच्या मूळ गावी राहण्यास तयार आहे. फॉरेस्ट मालुर गावातच वास्तव्य करून राहत आहेत. येथील नागरिकांना शासकीय योजनाचा लाभ मिळत नसल्यामुळे गावकरी व्यथीत आहेत. धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांना वारंवार गाव विकास योजनेचा माध्यमानुसार ग्रामपंचायत अंतर्गत वित्त आयोगाचा निधी व पैसे निधी देण्यात यावा, या करिता मागणी केली होती. परंतु गटविकास अधिकारी सदरहू योजनांचा लाभ देण्यास नाकार देत आहे. एक प्रकारे येथील नागरिकांवर अन्याय करून गावाला विकासापासून वंचित ठेवत आहे. फॉरेस्ट मालूर गावाला धारणी तालुक्यातील नकाशामध्ये समाविष्ट करण्यात यावे. अशी मागणी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना संघटक प्रमुख पंकज मावस्कर, नंदराम भुसुम, ओमकार कास्देकर, बाबूलाल बेठेकर आदी सह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फॉरेस्ट मालूर येथील ग्रामस्थांनी शासकीय योजना पासून वंचित...
राजु भास्करे / चिखलदरा