बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी च्या पुव॔ उच्च प्राथमिक शिष्यवृती परिक्षेत येथून जवळच असलेल्या मच्छिंद्रखेड येथील जि.प.मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थीनी कु.भाग॔वी भुजंग व्होनमाने हिने जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत रथान पटकावले आहे.तसेच सदर विद्यार्थी नी ची या अगोदर सुध्दा नवोदय परिक्षेत निवड झाली आहे. त्यामुळे येथील शाळेच्या इतिहासामध्ये असे दुहेरी यश मिळाले आहे. सदर विद्यार्थीनी ला वग॔शिक्षीका कु. प्रिती दाते यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक भुजंग व्होनमाने,सहायक शिक्षक मंगेश साबळे, दामोदर दांडगे आदींचे माग॔दश॔न लाभले आहे. कु.भाग॔वी व्होनमाने शिष्यवृत्ती व नवोदय परिक्षेत यश मिळविल्या मुळे तीचे सव॔ञ अभिनंदन व कौतुक होत आहे.