शिकवणीला शेगाव येथे जातो असे सांगून 16 वर्षीय शाळकरी विद्यार्थी घरून निघुन गेला असल्याची घटना दि.20 जानेवारी रोजी टाकळी विरो येथे घडली. पोलीस सुञांनी दिलेल्या माहितीनुसार या बाबत वृत्त असे कि जलंब पो.स्टे.अंतग॔त येथुन जवळच असलेल्या टाकळी विरो ता.शेगाव येथील चि.अथ॔व भानुदास बहुरूपे वय 16 वष॔ हा दहावीत शिकत असलेला शाळकरी विद्यार्थी सकाळी 6 वाजता च्या सुमारास घरन शेगाव येथे शिकवणी वर्गाला जातो असे सांगून घरन निघून केला. परंतु संध्याकाळपर्यंत सदर शाळकरी विद्यार्थी घरी परत आला नाही. सदर विद्यार्थीची ऊंची 5 फुट 5 इच असुन रंगाने गोरा आहेत बांधा सरळपातळ , अंगात काळ्या रंगाचे शट॔ व बदामी रंगाचा फुलपाॅट व बदामी रंगाची चप्पल घातलेली आहे वरिल वण॔नाचा विद्यार्थी कोणाला दिसल्यास त्यांनी जलंब पो.स्टे दुरधनी क 0765-277542 वर किंवा बिट जमदार सुभाष चोपडे यांच्या मोबाईल क्र.8208081695 वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे.अशी तक्रार भानुदास समाधान बहुरुपे रा.टाकळी विरो यांनी जलंब पो.स्टे दिली. यावरून जलंब पोलीसांनी मिसिंग दाखल केली आहे.
16 वर्षीय अथर्व बहुरुपे हा शाळकरी विद्यार्थी घरून निघून गेला...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख