मानाचा असलेला खामगाव रत्न पुरस्कार अशोक सोनोने यांना. तर स्व बाळासाहेब बिन्नीवाले पुरस्कार - शरदबाप्पू देशमुख तर खामगाव गौरव-तरूणाई फाउंडेशन ला खामगाव प्रेस क्लब चा उपक्रम...


सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी R.C24 न्युज

खामगाव प्रेस क्लब खामगाव च्या वतीने दिल्या जाणारा प्रतिष्ठेचा खामगाव रत्न पुरस्कार यंदा समाजसेवक अशोक सोनोने यांना प्रदान करण्यात आले. तर खामगाव गौरव हा पुरस्कार तरुणाई फाउंडेशन ला बहाल करण्यात आला असून  स्व.बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्काराने   जेष्ठ पत्रकार शरद देशमुख यांना गौरविण्यात आले. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी या पुरस्कारांचे वितरण पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.दरवर्षी प्रमाणे यंदाही खामगाव प्रेस क्लब खामगावच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त ६ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खामगाव प्रेस क्लब खामगाव कडून शहराचा नावलौकीक वाढविणाऱ्या व्यक्तीचा खामगाव रत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. तसेच शहरात व ग्रामीण भागात समाजसेवेचा वसा घेवून जी संस्था निस्वार्थ सेवाकार्य करते अशा संस्थेला खामगाव गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सोबतच पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकार बांधवास स्व.बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. यावर्षी खामगाव रत्न या पुरस्कारासाठी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा खामगाव चे समाजसेवक अशोकभाऊ सोनोने यांचे नाव पत्रकारांच्या वतीने सर्वानुमते ठरविण्यात आले. कोरोना महामारी संकटाच्या काळात शहरवासीयांच्या प्रत्येक हाकेला मदतीसाठी धावून आलेल्या व आरोग्य दूत म्हणून ओळख असलेल्या खऱ्या समाजसेवकाच्या कार्याची दखल घेवून खामगाव प्रेस क्लब खामगावच्या वतीने घेण्यात आली. खामगावचे आमदार ऍड आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, तहसीलदार अतुल पाटोळे प्रेस कळंब चे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले यांच्या हस्ते बहाल करण्यात आले. तर खामगाव गौरव हा पुरस्कार तरुणाई फाउंडेशन ला बहाल करण्यात आला असून  स्व.बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्काराने जेष्ठ पत्रकार शरद देशमुख यांना गौरविण्यात आले.

Previous Post Next Post