Covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पळशी सुपो येथील यात्रा रद्द...

जळगांव जा.प्रतिनिधी:-

दरवर्षी पौष महिन्यामध्ये श्रीक्षेत्र पळशी सुपो येथील श्री सुपो महाराज यांचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो परंतु मागील वर्षीपासून covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा यात्रा महोत्सव याहीवर्षी रद्द करण्यात आला आहे. दिनांक 4 जानेवारी रोजी श्री संत सुपोजी महाराज संस्थान पळशी सुपो येथे जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात एक बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये गावचे सरपंच पोलीस पाटील सुपो पळशी येथील गावकरी मंडळी तसेच सुपर महाराज संस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली यामध्ये कोरोनाचा वाढत असलेला प्रभाव लक्षात घेता येथील यात्रा महोत्सव जसे की कोणत्याही प्रकारची खेळणी दुकाने प्रसादाची दुकाने हॉटेल यासारखे अनेक वस्तूंची दुकाने येथे आणू नये. तसेच covid-19 च्या निर्बंधाचे पालन करीतच श्री सुपो महाराज यांचे दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे फक्त येताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत दर्शनाची मुभा देण्यात आली आहे.

 

Previous Post Next Post