जळगाव जा.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी २०२०/२०२१ ला खरिपाचा पीक विमा काढला होता.त्यानुसार विमा कंपनीने काही मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा त्यांच्या खात्यात वर्ग सुद्धा केलेला आहे.मात्र काही कृषी मंडळातील शेतकऱ्यांचे ऑनलाईन प्रणाली नोंदणी करतांना तांत्रिक चुका त्यामध्ये ( खाते क्रमांक, नावात चुक, बँकेचे नाव आदी काही ) झाल्यामुळे तालुक्यातील १२० अशा शेतकऱ्यांना कंपनी द्वारा संरक्षित रक्कम तीन महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा खात्यात वर्ग करण्यात आलेली नाही.या १२० पिक विमा मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना वार्यावर न सोडता त्यांना हा पिक विमा वर्ग करण्यात यावा.नसता शेतकऱ्यांच्या रोषाला पिक विमा कंपनी व शासन यांना सामोरे जावे लागेल.पहिलेच पीक विम्याची रक्कम कंपनीने व शासनाने शेतकऱ्यांना तुटपुंजी स्वरूपात दिलेली आहे.त्यात 120 शेतकरी पिक विम्या पासून वंचित हे पिक विमा कंपनी व शासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.ही मागणी घेऊन दिनांक 4 जानेवारी 2022 मंगळवार रोजी तहसीलदार शितल सोलाट मॅडम तसेच तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद त्यांच्याकडे शेतकऱ्यांसमवेत गेलो होतो.यावेळी अक्षय पाटील, वैभव जाणे, मंगेश कातोरे, विवेक रोठे, बाळकृष्ण घुळे, प्रकाश अंबलकार, तुकाराम पाटील, दिगंबर वायझोडे,मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
ऑनलाइन प्रणाली मध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती करून सुद्धा तालुक्यातील 120 शेतकरी पीक विम्यापासून वंचित...
प्रतिनिधी/मंगल काकडे.