जामोद येथे महिलांच्या स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विक्री स्टॉल व आनंद नगरी आयोजन करून महिला दिन साजरा..सरपंचांकडून जामोद येथील 101 महिला बचत गटांचा सत्कार..


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जामोद येथे 8 मार्च 2022 रोजी जामोद चे लोकनियुक्त सरपंच सौ. गंगुबाई पुंडलीकराव दामधर,  महिला बचत गटाच्या कॅडर  संगीता दलाल, रेखा काटोले, हर्षा बोडखे, कल्पना दलाल, आशा बोडखे, अश्विनी बोडखे यांच्या सह जामोद येथील 700 पेक्षा अधिक महिलांनी एकत्रित महिला दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष जामोद चे लोकनियुक्त सरपंच सौ. गंगुबाई दामधर , प्रमुख अतिथी म्हणून प्रभाग संघ अध्यक्षा पुष्पाताई नानगदे, रेखाताई ढगे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रभाग समन्वयक अनिल कफनकर, तालुका अभियान व्यवस्थापक विनोद शेगोकार यांची उपस्थिती होती.जामोद येथील महिला बचत गटांची संख्या व महिला बचत गटांचे कॅडर यांची उत्कृष्ट कामगिरी चा गौरव म्हणून जामोद चे सरपंच व सौ मीनल समाधान दामधर यांनी स्वच्छेने 101 महिला बचत गटांच्या अध्यक्षांच्या स्कार्प देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना सौ दामधर म्हणाल्या की बचत करणे हा महिलांच्या अंगी असलेला मूलभूत गुण आहे, आज जामोद मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने महिलांचा बचत गटांमध्ये असलेला सहभाग खरोखर कौतुकास्पद आहे व कॅडर ने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. महिलांनी आपल्या मुलांचे शिक्षण व व्यवसायिकता याकडे विशेष लक्ष दिल्यास आपल्या परिसरात आमूलाग्र बदल घडल्याशिवाय राहणार नाहीत.यावेळी सुरवातीला गावातील महिला भजन मंडळांचा भजनाणीं कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन पाहुण्यांचे स्वागत, मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, महिलांचे विविध वेशभूषा, विविध विक्रीचे स्टॉल, आनंद नगरी, विविध सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी आयोजित केले गेले.

Previous Post Next Post