अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या ऑटोला खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पकडले असल्याची घटना दि 15 मार्च रोजी सकाळी आठ वाजता च्या सुमारास पहुरजिरा - मोरगाव रोडवर घडली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बाबत वृत्त असे कि होळीचा सण असल्यामुळे शहरीभागातुन ग्रामीण भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या देशी दारू जाणार असल्याची गोपनीय माहिती खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी विशेष पथकाला माहिती दिली त्यावरून विशेष पथकाने सापळा रचून पहुरजिरा - मोरगाव रस्त्यावर अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या ऑटो क.M.H28 T.1074 मध्ये असलेला परमेश्वर श्रीकृष्ण लाहुळकार रा.पारखेड याला रंगेहाथ पकडले व त्यांच्या जवळून देशी दारूचे 16 बॉक्स किंमत 48 हजार रुपये, ऑटो 1 लाख रुपये, एक मोबाईल असा एकूण 149000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक याच्या पथकातील कर्मचारी पो.हे.का गजानन बोरशे ,ना.पो.का गजानन आहेर, संदीप टाकसाळ यांनी केली आहे.
पहुरजिरा - मोरगाव रोडवर अवैधरीत्या दारू घेऊन जाणारा ऑटो पकडला... दिडलाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाची कारवाई...
सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी R.C24 न्युज