140 गाव पाणीपुरवठा योजनचे लवकरच होणार विस्तारीकरण - आ डॉ संजय कुटे..पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी परिपूर्ण होणार जळगाव जामोद मतदारसंघ..


बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन या योजने अंतर्गत 140 गाव पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरनाला मान्यता. 140 गाव पाणीपुरवठा योजना यशस्वी पणे पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघातील जनतेला योग्य पाणीपुरवठा व्हावा याकरिता योजने चे विस्तारीकरण होणे अत्यंत गरजेचे होते. या बाबत आ डॉ कुटे यांनी सतत पाठपुरावा सुरू केला होता. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकतीच ही बाब त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या लक्षात आणून दिली होती. त्यानुसार पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे यांनी या बाबत बैठीकीचे दिनांक 24 मार्च रोजी मुंबई येथे त्यांच्या दालनात  आयोजन केले होते.त्यानुसार या बैठीकत जळगाव जामोद शहर व संग्रामपूर शहर ची वाढीव वितरण व्यवस्था व ईतर उपांगाचे 135 एम एल डी नुसार कामे व 140 गाव पाणीपुरवठा योजनची घेण्यात येणार रिट्रो फिटिंग ची कामे एकत्रित होण्याबाबत आ डॉ संजय कुटे यांनी दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा केल्यानंतर सर्वेक्षण करून अहवाल देण्याबाबत मंजुरी देण्यात आली. यामुळे जळगाव जामोद मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांना आता 40 लिटर ऐवजी दरडोई दर मानसी 55 लिटर तर शहरी भागात 135 लिटर या प्रमाणे पाणी मिळणार आहे. यासाठी न प क्षेत्रातील वाढीव वितरण व्यवस्था , पाण्याच्या टाक्या, व ईतर उपांगाचे सविस्तर सर्वेक्षण  करून 15 दिवसाचे आत प्रकल्प अहवाल शासनास सादर करण्याचा सुचना यावेळी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठीकीला पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचीव व त्यांचे अधिकारी, नगरविकास विभागाचे सांबांधित अधिकारी, संग्रामपूर न प चे मुख्याधिकारी प्रशांत शेळके, जळगाव न प चे मुख्याधिकारी आशिष बोबडे, व ईतर अधिकारी उपस्थीत होते.

Previous Post Next Post