धारणी पासून बारा किमी अंतरावर असलेल्या चिचघाट जवळील तापी नदीवरील झिरण्या घाटावर रेतीने भरलेला ट्रॅक्टर पालटल्याने भोकर्बर्डी येथील ड्राइवर विशाल मदन मावसकर यांचा दबून मृत्यू झाला आहे. सदर ट्रॅक्टर विजय मालवीय भोकरबर्डी यांच्या मालकीचा असून ट्रॅक्टर त्याचा क्र.MP10AA 3200 आहे.चालक विशाल मदन मावसकर नदी पात्रातून रेतीने भरलेला ट्रॅक्टर काढत असताना ट्रक्टर मध्ये ओवरलोड झाल्याने ट्रक्टर चा समोरील भाग पालटून ट्रालीवर पडल्याने सदर ड्राइवर जागीच ठार झाला.धारणी तालुक्यात यापूर्वीही कुटंगा येथील अवैध रेती तस्करी करताना ट्रॅक्टरवरील मजुराचा त्याखाली दाबून मृत्यू झाला होता.तालुक्यात अवैध गौणखनिजाला ऊत आल्याने घाई गडबडीत अश्या प्रकारच्या घटनामध्ये वाढ होत आहे. सदर रेती घाटाचा लिलाव पाच वर्षानंतर दोन महिन्यापूर्वीच झाल्याने सदर रेती घाटातून रेती चे उत्खनन करून नदि पात्राच्या बाहेर काही अंतरावर साठवून ठेवले जात आहे. त्याच गडबडीत सदर घटना घडली असल्याने एकच चर्चा सुरु आहे.
चिचघाट येथील झिरण्या तापी रेतीघाट वर ट्रॅक्टर चा अपघात..चालक जागीच ठार...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
