उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, पंजाब या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकींचे निकाल आज जाहीर झाले आहेत. पाच पैकी चार राज्यांत भाजपाने दणदणीत विजय मिळवत बहुमत प्राप्त केले आहे. या चार राज्यांतील विजयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. आज या निवडणुकांचे निकाल घोषित होताच संपूर्ण देशात विजयाची धुरवड सुरू झाली आहे. भाजपा कार्यालयात सुद्धा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी दुर्गा चौकात फटाके फोडून, जोरदार घोषणाबाजी करून व एकमेकांना पेढा भरवून हा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी चारही राज्यांतील मतदारांचे आभार मानत सर्वांना या विजयाच्या शुभेच्छा दिल्या व "या चार राज्यांतील भाजपाचे बहुमत म्हणजे देशातील आगामी काळातील सर्वच विधानसभा व लोकसभा विजयाची नांदी आहे. हा विजय म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास आहे. येणाऱ्या काळात देखील हा विश्वास जनतेचा विश्वास संपादन करीत महाराष्ट्रात देखील विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा बहुमतात विजय प्राप्त करेल असा विश्वास या विजयाने निर्माण केला आहे.
4 राज्यात विधानसभांतील भाजपाचे बहुमत ही आगामी विजयाची नांदी.भाजपा विजयाचा भाजपा कार्यकर्त्यांचा दुर्गा चौकात फटाके व पेढा भरवून जल्लोष...
जळगांव जा.प्रतिनिधी:-