टेबुरसोंडा येथिल आ. वि. का. सोसायटी वर दयाराम काळे यांच्या नेतृत्वात काॅगेसचा झेंडा.अध्यक्ष पदी बाबू जावरकर तर उपाध्यक्ष पदी परसराम मावस्कर...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी

चिखलदरा तालुक्यातील टेबुरसोंडा येथिल आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित यांची अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक दि. 11/3/2022 ला   होती. या निवडणुकीमध्ये काॅगेस आणि प्रहार अशी लडत झाली असून या मध्ये प्रहार पक्षाला अध्यक्ष व उपाध्यक्ष साठी बहुमत सिद्ध करता आले नसुन. प्रहार पक्षाला पराभवाचा सामना पत्करावा लागला आहे. तसेच काॅगेस ला तेरा सदस्य पैकी आठ सदस्यांचा पाठींबा अध्यक्ष व उपाध्यक्षा साठी मिळाला असून प्रहार पक्षाला पाच सदस्यावरच समाधान मानावे लागले.या निवडणुकीत मध्ये काॅगेसच्या सदस्यांनी अमरावती जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांच्या नेतृत्वात काॅगेसचा झेंडा एक हाती मजबूत केला असल्याचे चित्र दिसून आले आहे.या निवडणुकी मध्ये काॅगेस अध्यक्ष म्हणून बाबू जावरकर तर उपाध्यक्ष पदी परसराम मावस्कर हे आहेत. तर सदस्य म्हणून शंकर बेलसरे, बुडा जामूनकर, बन्सी दहीकर, दयालाल खडके, रुखमा जावरकर, सगिंता जामूनकर असे आहे. तर विरोधी पक्षाचे सदस्य सुरेश सभुंजी खडके, रामजी (पेन्टर) सावलकर, श्रीकृष्णा कोडापे, गणेश खडके, लक्ष्मण खडके असे आहेत.

----------------------------------------

चिखलदरा तालुक्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित यांची संख्या सोळा असुन या मध्ये अकरा सहकारी संस्थावर काॅगेस च्या ताब्यात आले आहे. राहीले पाच सहकारी संस्था वर लवकरच काॅगेस ताब्यात घेणार आहे.टेबुरसोंडा येथिल आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था वर अटी तटी लडत होती परंतु विरीधी सदस्यांना अध्यक्ष व उपाध्यक्ष साठी बहूमत सिध्द करता आले नसुन टेबुरसोंडा येथिल सहकारी संस्था वर काॅगेस ने बाजी मारली आहे.

दयाराम काळे

सभापती

समाज कल्याण अमरावती

Previous Post Next Post