अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला प्रियकराच्या मदतीने काटा !सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथील खळबळजनक घटना !मृतकाच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीला अटक !


 सिंदखेड राजा/ सचिन खंडारे

अनैतिक संबंध मध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे दिनांक 15 मार्च रोजी घडली,याबाबत मृतक दत्तात्रय रूपलाल कव्हळे यांची आई श्रीमती तुळसाबाई रूपलाल कवळे वय 66 वर्षे यांनी साखरखेडा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी मध्ये असे म्हटले आहे की,मोठा मुलगा दत्तात्रय रूपलाल कव्हळे वय ४० वर्षे हा त्याची पत्नी व मुलासह आमच्यातून वेगळा राहतो मी माझा मुलगा अशोक रुपलाल कव्हळे यांच्या सोबत राहते,माझा मुलगा दत्तात्रेय रूपलाल कव्हळे हा आमच्या पासून थोड्या अंतरावर गावातच राहतो त्याला दोन मुले व एक मुलगी आहे वीस ते पंचवीस दिवसापूर्वी माझा मुलगा दत्तात्रेय रुपलाल कव्हळे याने त्याची पत्नी मीरा दत्तात्रय कव्हळे वगावातील एजाज खान शहजाद खान पठाण यांच्या सोबत प्रेम संबंध असल्याबाबत मोबाईल वर रेकॉर्डिंग पकडली होती,तेव्हा माझा मुलगा दत्तात्रेय रुपलाल कव्हळे याने त्याची पत्नी मीरा दत्तात्रय कव्हळे हिला तिच्या माहेरी आडाभारज येथे नेऊन सोडले,दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ अनिल खनसरे हा मिरा ला घेऊन गोरेगाव येथे आला ,तेवढे आम्ही माझा मुलगा दत्तात्रेय रुपलाल कव्हळे त्याला समजावून सांगितले वमुलगा दत्तात्रेय रूपलाल कव्हळे त्याच्या सोबत त्याची पत्नी मिरा हिला नगर येथे कामाला पाठवले,परंतु दत्तात्रेय कवळे याला  मिरा चे बाहेरील अनैतिक संबंध माहिती झाल्यामुळे तो दारू पिऊन टेन्शनमध्ये राहत होता,आम्हाला जमीन विकत घ्यायची असल्यामुळे आम्ही माझा मुलगा दत्तात्रय रुपलाल कव्हळे याला गावी बोलून घेतल्याने तो त्याच्या पत्नीसह दिनांक 14 मार्च रोजी गोरेगाव येथे आला .घरी थांबला .दिनांक 15 मार्च रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजता दरम्यान मुलगा दत्तात्रेय रूपलाल कव्हळे माझ्या घरी आला व मला शेतीचे खरेदीबाबत बोलला व त्याची मुलगी कुमारी रोशनी तिला पेपर देण्याकरता साखरखेर्डा येथे घेऊन गेला,अंदाजे साडेबारा ते एक च्या दरम्यान मी माझा मुलगा दत्तत्रय रूपलाल कव्हळे यांच्या घरी गेली असता त्याच्या घरातून मी आमच्या गावातील एजाज खान शहजाद खान पठाण याला पळून जाताना पाहिले त्यानंतर मी माझ्या मुलाच्या घरात गेली असता माझा मुलगा दत्तात्रय रूपलाल कव्हळे हा पलंगावर झोपलेला होता,त्याचे पाय रुमालाने बांधलेले होते तो तोंडावर चादर टाकलेली होती तेव्हा मी त्याच्या जवळ जात असताना मला माझ्या सुनेने म्हटले किती झोपले आहे त्याला उठवू नका,दोन तासानंतर मला माझी सून मीरा तिने फोन करून सांगितले की माझे पती दत्तात्रय कव्हळे हे काहीच हालचाल करीत नाहीत ,तेव्हा मी मुलाच्या घरी गेले असता माझा मुलगा दत्तात्रेय रुपलाल कव्हळे त्याच्या गळ्याला गळफास लावल्याचे व्रण दिसत होते,तो पलंगावर पडलेला होता तेव्हा त्याला आम्ही तात्काळ गावातील सत्तर खान पठाण यांच्या गाडीत सरकारी दवाखाना साखरखेडा येथे आणले,तेथून डॉक्टर आणि चिखली ग्रामीण रुग्णालय येथे रेफर केली तेव्हा आम्ही ॲम्बुलन्स मध्ये माझ्या मुलाला घेऊन जात असताना माझी सून मिरा हिला दत्तात्रय च्या गळ्याला व्रण कशाचे आहेत तु त्याचे पाय बांधले होते का असे विचारले असता,माझी सून मिरा मिनी मला सांगितले की दत्तात्रय रूपलाल कव्हळे हा आपले प्रेमसंबंध अडथळा करीत आहे त्यामुळे आपण त्याचा काटा काढू म्हणून माझे पती दत्तात्रय कव्हळे हे दारू पिऊन आले असता .दुपारी साडेबारा ते एक वाजेदरम्यान एजाज खान शहजाद खान पठाण आपल्या घरी आला व त्याने माझे पती दत्तात्रेय रुपलाल कवळे यांचे पाय रुमालाने बांधून धरले व मी दत्तात्रेय त्यांच्या गळ्याला दोरी आवळून गळफास लावला त्यामुळे ते जागेवरच पडले .तेथील डॉक्टरांनी माझा मुलाला मृत घोषित केले तरी माझी सून मीरा दत्तात्रय कव्हळे गावातील एजाज खान सहजाद खान पठाण .यांचे अनैतिक संबंध माझा मुलगा दत्तात्रेय रुपलाल कवळे याला माहीत झाल्याने त्याचे पाय रुमालाने बांधून व दोरीने गळा आवळून खून केला आहे .अशा आशयाची तक्रार मृतकाचे आईने साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दि 16 मार्चला तक्रार दिली असून .पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी . मिरा दत्तात्रय कव्हळे वय 36 वर्षे व एजाज खान सहजादखान पठाण वय ४५ वर्ष यांच्यावर अपन व कलम, 302, 32 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तसेच आरोपींना अटक करण्यात आले आहे .या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी घटनास्थळी भेट दिली .पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे व पोलीस करीत आहे .या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे .

Previous Post Next Post