पानखाल्या येथील ग्रामसेविका विरोधात जि प अध्यक्षाकडे तक्रार...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी पासून बारा की. मी. अंतरावरील पाणखाल्या ग्रामपंचायतच्या सचिव कु. रेखा खवळे यांच्या कार्यप्रणालीवर आरोप  करत सरपंच उपसरपंचांसह सदस्यांनी सदर ग्रामसेविकेची त्वरित बदली व्हावी असे निवेदन जि. प.अध्यक्ष बबलू देशमुख यांना देऊन विनंती केली.पाणखल्या चे सचिव कु. रेखा  खवळे ह्या नेहमी सरपंच व इतर सदस्या सोबत अपमानजनक बोलतात. व शासनाचा आलेला निधी खर्च करत नसल्याने त्यांना याबाबत सद्यस्यांनी विचारणा केल्यावर उद्धट उत्तर देतात.व याबाबत काही बोलल्यावर महिला असल्याने पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देण्याची धमकी देतं असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच सदर सचिव सतत गैरहजर असतात,या बाबत गटविकास अधिकारी यांना कित्येकदा निवेदन दिल्यावर ही त्यांनी काहीच कार्यवाही केली नाही.असेही सरपंच सौं संगीता धुर्वे व उपसरपंच मांगीलाल पटोरकर यांनी सांगितले.तक्रार देताना माजी जि प सदस्य श्रीपाल पाल, अंबाडीचे नांदुरकर, सरपंच सौं संगीता धुर्वे, उपसरपंच मांगीलाल पटोरकर, ग्रापं सदस्या रमेश मावसकर, अर्जुन मावसकर, किशन जांबेकर,सौं मनीषा नांदुरकर इत्यादी उपस्थित होते.

Previous Post Next Post