रेतीची वाहतूक करणाऱ्या गाडीची रॉयल्टी चेक करण्याचे कारणावरून महसूल कर्मचारी व रेती माफिया मध्ये बाचाबाची..तहसील कार्यालयाच्या गाडीवर दगडफेक..


बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख 

रेतीची वाहतूक करणाऱ्या गाडीची रॉयल्टी चेक करण्याचे कारणावरून महसूल प्रशासनाचे कर्मचारी व रेती माफिया मध्ये शाब्दिक चकमक व बाचाबाची झाली आहे. व तहसील च्या शासकीय गाडीवर दगडफेक झाली असल्याची घटना दि. 14 मार्च रोजी संध्याकाळी 6.30 सुमारास कठोरा शिवारात घटली.याबाबत वृत्त असे कि शेगाव तहसील कार्यालयाची गाडी एम एच 28 शी 6451 हि भारतन वरन कठोरा कडे जात तपासणी करण्यासाठी जात  असतांना कठोरा शिवारात रेतीची वाहतूक करणाऱ्या गाडीची रॉयल्टी चेक करित असतांना गाडीतील महसूल प्रशासनाचे कर्मचारी व रेती माफिया यांच्या मध्ये शाब्दिक चकमक होऊन बाचाबाची झाली. तर रस्त्यावर उभे असलेल्या शासकीय गाडीवर सुध्दा दगड भेक करण्यात आली असून या मध्ये गाडीचा मागील काच सुद्धा फुटला आहे. तर या घडलेल्या प्रकाराबाबत जलंब पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरूद्ध कारवाई करण्याची प्रकिया सुरु असुन वृत्त लिहे पय॔त गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.

Previous Post Next Post