अखिल भारतीय किसान सभेचे नेते कॉम्रेड विजय पोहनकर ह्यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 14 मार्च 2022 ला उपविभागीय अधिकारी जळगांव (जामोद)ह्यांच्या मार्फत रेल्वे मंत्री भारत सरकार ह्यांना निवेदन पाठविण्यात आले. नांदुरा रेल्वे गेट हे नांदुरा व जळगांव (जामोद)तालुक्यातील जाणते करिता मरणाचे द्वार झाले आहे. नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील रेल्वे गेट हे दररोज किमान प्रत्येक वेळी तास-तास भर बंद असते.रेल्वे ची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने रेल्वे गेट बंद असणे अनिवार्य आहे.मात्र,त्यामुळे लाखो लोकांचे अतोनात हाल होत आहेत.रुग्ण दगविण्याचे मुख्य कारण हे रेल्वे गेट आहे.शैक्षणिक नुकसान,अधिकारी, नैकरदार वर्गाला मिटिंग ला पोहोचताना होणारा त्रास,व्यापारी,शेतकरी मंडळींची वाताहत फक्त आणि फक्त या रेल्वे गेट नी होत असतानाच 2014 ला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व तत्कालीन आमदार चैनसुख संचेती ह्यांनी या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले होते.स्वतः गडकरींना या गेट मुळे किती त्रास झाला हे त्यांनी उदघाटन भाषणात जनतेला सांगितले.परंतु,माशी कुठे शिंकली मागील 8 वर्षात या उड्डाणपुलाचे काम एक वीट सुद्धा ठेवण्यात आली नाही.त्यामुळे जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला असल्याने अखिल भारतीय किसान सभेने हा मुद्दा उचलत 31 मार्च 2022 पर्यंत भारत सरकार ने निर्णय न घेतल्यास 1 एप्रिल 2022 पासून नांदुरा रेल्वे गेट जवळ असलेल्या पूजनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन घेण्याचे निवेदनात म्हटले आहे.जो पर्यंत रेल्वे गेट वर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याचे वाचन रेल्वे मंत्री देणार नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.ह्या आंदोलनावर जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड अनिल गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड ज्ञानदेव तायडे,कॉम्रेड रामेश्वर काळे,कॉम्रेड शेख अकबर,कॉम्रेड ऍड.शिरीष मारोडे कॉम.अंबादास सातव ह्यांच्या साह्य आहेत
उड्डाणपूल बांधा अन्यथा अखिल भारतीय किसान सभेचे 1 एप्रिल पासून बेमुदत धरणे आंदोलन...
जळगांव जा.प्रतिनिधी:-