जळगांव जा.प्रतिनिधी:-
8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्ताने महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद तालुका व शहर महीला काँग्रेसच्या वतीने 10 मार्च रोजी जळगाव (जा) येथील कृषी विज्ञान केंद्र येथे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनाच्या निमित्ताने सन्मान कर्तुत्वाचा- सन्मान नारीशक्तीचा असा उद्योजक सोहळा कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रात यशस्वी भरारी घेणाऱ्या महीलाचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऍड. सौ.जयश्रीताई शेळके (सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तसेचअध्यक्षा दिशा महिला बचत गट फेडरेशन) , ऍड.सौ.ज्योतीताई ढोकणे (अध्यक्षा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्था), तसेच सौ.मंगलाताई पाटील (नवनियुक्त महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा), सौ.पुजाताई अवचार (माजी जि.प.सदस्या) यांचा सत्कार गौरवचिन्ह व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.जळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व महीला सरपंच यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये जळगांव जामोद तालुक्यातील पिपळगांव काळे संरपच सौ.आशा सुनिल कळस्कार, धानोरा महासिध्द संरपच सौ.वैशाली विश्वभर वावगे, आकोला खुर्द संरपच सौ.ताराबाई वसंत बोदडे, वडशिगी संरपच सौ.शितल सुनील वानखडे व संग्रामपुर तालुक्यातील रुधाणा सरपंच सौ.सरला जानराव सातव, वरवट बकाल सरपंच सौ.विजया विजय इंगळे, वसाली सरपंच सौ.मैनाबाई हुसैन पालकर, आदी सरपंच याचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ.सौ.स्वाती वाकेकर यांनी अध्यक्षीय भाषणात बोलतांना काँग्रेस पक्षाला बळकट करण्याचे महत्त्वाचे योगदान महिला काँग्रेसचे असून आगामी काळात महिलांनी पुढे येऊन समाजकार्या सोबत राजकारनात हिरारीने सहभाग घेतला पाहिजे. तसेच यावेळी सौ. जयश्रीताई यांनी बोलतांना महिलांनी आपल्या रोजच्या रोजनिशी सोबत जोडधंद्या ची जोड दिली पाहिजे. तसेच यावेळी सौ.ज्योतीताई ढोकणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकतांना आपल्या लेकीला शिकविले पाहिजे, तिला सुसंस्कृत बनविले पाहिजे असे सांगितले. तसेच नवनियुक्त महिला जिल्ह्याध्यक्ष सौ.मंगला पाटील यांनी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आपली सर्वांची मदत लागेल असे सांगितले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर (सचिव ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ) तसेच प्रमुख अतिथी म्हणून अँड.सौ.जयश्रीताई शेळके (सचिव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), अँड.सौ.ज्योतीताई ढोकणे(कार्यकारी सदस्य, महाराष्ट्र महीला काँग्रेस), सौ.मंगलाताई पाटील (जिल्हाध्यक्षा,महिला काँग्रेस) सौ.पुजाताई अवचार (माजी जि.प.सदस्या), सौ.नंदाताई धंदर (पं.स.सदस्या), सौ.गौरीताई सातव, सुनिताताई कलोरे, सुनिताताई देशमुख, परवीनताई देशमुख,सौ.राधाताई खापट सौ.मिनाताई सातव, सुरेखाताई पळसकर, सौ.मिराताई माळी, सौ.सुनीताताई झाडोकार,सौ.चित्राताई इंगळे, सौ.उज्वलाताई पाटील, प्रतिभाताई रोठे, आशाताई गोंड, उन्हाळे ताई उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाच्या वेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई च्या वेशभूषेत श्रीमती संगीताताई इंगळे यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले जळगांव जामोद तालुक्यातील महिला बचत गटाच्या अध्यक्षांच्या सत्कार गौरवचिन्ह देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील असंख्य महिलांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुन सौ.मीनाताई सातव यांनी जळगाव जा तालुक्यात महीला काँग्रेसने राबविलेल्या विविध उपक्रमाचा यावेळी आढावा दिला. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.कोमल निवाणे व कु.आश्विनी शिंगणे यांनी व आभार प्रदर्शन परवीनताई देशमुख यांनी केले.