जळगाव जामोद येथील बहुजन समाज पार्टीचे युवा कार्यकर्ते तथा माजी शहराध्यक्ष सुधीर नारायण पारवे तसेच मोहम्मद फारुख खैराती यांनी प्रहार जनशक्ती या ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे .संग्रामपूर येथील कार्यक्रमात सुधीर पारवे व मोहम्मद फारूक यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री बच्चू कडू यांनी येणार्या नगरपरिषद निवडणूक संदर्भात मार्गदर्शन केले तसेच तालुक्यातील गोरगरीब जनता यांची कामे कार्यतत्परतेने व्हावी यासाठी झटावे असे सांगितले या वेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ही वेळ बदलांची आहे काळ कोणासाठी थांबत नाही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे असे संबोधित केले जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रात ही बदलाचे वारे वाहत आहे असा संदेश बच्चू कडू यांनी दिले आहेत शालेय जल कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या या कार्यक्रमामुळे या भागातील गोरगरीब युवा अपंग विधवा निराधार असलेल्या जनतेत नवचैतन्य निर्माण झालेले आहे .
बहुजन समाज पार्टीचे युवा कार्यकर्ते माजी शहराध्यक्ष सुधीर पारवे व मोहम्मद फारुक खैराती यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश...
जळगांव जा.प्रतिनिधी;-