राम श्रीराम पिंजरकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड सर्वप्रथम महामानवांना अभिवादन करून सत्कार समारंभ संपन्न...


मंगल काकडे/पिंपळगाव काळे प्रतिनिधी.

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थी आपल्या अथक प्रयत्नाने आणि आई-वडिलांच्या सहकार्याने त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. ही बातमी जेव्हा पिंपळगाव काळे गावामध्ये कळाली तेव्हा सर्व आनंदाने त्या यशस्वी विद्यार्थ्याचा कौतुक करू लागले. दिनांक 26 मार्च रोजी पिंपळगाव काळे गावामध्ये प्रवेश केल्यानंतर पी. एस.आय.राम श्रीराम पिंजरकर. यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.तथागत गौतम बुद्ध. राजश्री शाहू महाराज. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले.यांच्या मुळे आपण या पदापर्यंत पोचलो या महामानवांना सर्वप्रथम अभिवादन केले. आणि त्यानंतर गावातील आणि समाजातील लोकांनी राम पिंजरकर यांचा सत्कार मोठ्या थाटामाटात केला.पिंपळगाव काळे येथील हा पहिला नागरिक असेल की. त्यांनी मला सर्वप्रथम महापुरुषांना अभिवादन करायचे आहे. अशी इच्छा व्यक्त केली. या सर्व महापुरुषांच्या प्रेरणेमुळे आणि माझ्या आई वडिलांच्या कष्टामुळे मी आज माझे ध्यर्य पूर्ण करू शकलो. व मला समाजसेवा आणि देश सेवा करायची आहे. त्यामुळे मी पोलीस उपनिरीक्षक या पदवीला प्राधान्य दिले. असे राम पिंजरकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्वांना सांगितले.तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या वतीने साहेबांचा व त्यांच्या सर्व कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी श्रीकृष्ण गवई सर यांनी राम पिंजरकर यांना सर्व गावाच्या वतीने शुभेच्छा देऊन आपण आपला परिवार. समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी पुढेही प्रयत्न कराल ही इच्छा प्रगत केली. व त्यांनी यशस्वीरित्या संचालन केले.यावेळी उपस्थितांमध्ये, पिंजरकर परिवार. समाधान पिंजरकर. श्री कृष्ण गवई.मंगल काकडे.महेश काकडे. बळीराम पिंजरकर. मंगेश पिंजरकर.श्रीकृष्ण काकडे. अविनाश काकडे. समाधान गवई. भीमराव गवई. कडू अवचार. शेख अर्षद. आनंदा बांगर. प्रमोद बांगर. अमोल बांगर. विनोद गवई. किशोर वाकोडे. राजेश्वर अवचार. रवींद्र गवई.देविदास ठाकरे. रामेश्वर वाघमारे.विलास पाटील. सुधाकर घटे. मुरलीधर बांगर. इत्यादी लोकांची उपस्थिती होती. व शेवटी आभार प्रदर्शन शुभम अवचार यांनी करून कार्यक्रमाचा समारोप केला.

Previous Post Next Post