प्रशांत भोपळे/हिवरखेड.
हिवरखेड शहराच्या वाढत्या लोकसंख्या नुसार पाहिजे तसा विकास आढळून येत नाही परंतु प्रामाणिक रित्या ग्रामपंचायत गावात स्वछता करण्याचे काम करत होती,मात्र गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायत सफाई कामगाराचा वेळेवर पगार करत नसल्याने तेथील सफाई कामगारांचे या आठवड्यात काम बंद केल्याची गंभीर बाब समोर येत आहे, सफाई कामगारांच्या काम बंद मुळे गावातील मुख्य चौका चौकात कचऱ्याचे ढीग आढळून येत आहेत तर भर रस्त्यावर गटाराच्या पाण्याचा चिखोल पाहण्यास मिळते, अशी परिस्थिती गावात निर्माण झाल्याने गावऱ्याच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे , एकीकडे गावात कचरा तर दुसरीकडे आरोग्य अडचणीत अशा गंभीर बाबीकडे वरिष्टानी लक्ष देऊन सफाई कर्मचाऱ्यांना वेतन देऊन हा प्रश्नन मोकळा करावा अशी मागणी सुदन नागरिक करीत आहेत,