असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी करूणानंद तायडे यांची निवड...


 सागर झनके/प्रतिनिधी.

दिनांक १८ मार्च रोजी शेगाव येथे झालेल्या राष्ट्रीय मूलनिवासी बहूजन कर्मचारी संघाच्या बैठकीमध्ये  करुणानंद तायडे यांची असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.असंघटित बांधकाम कामगार शाखेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रा.डाँ. एस.एन.भदरगे,राज्य सदस्य नारायण पडघान यांच्या उपस्थित जिल्ह्यातील कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष पदी करूणानंद तायडे सरसागर मोरे जिल्हा प्रभारी,अभिजित ढोले जिल्हा उपाध्यक्ष,सुधीर सोनटक्के उपाध्यक्ष, विजय इंगळे सचिव, अविनाश तायडे कार्याध्यक्ष, संजय इंगळे मिडिया प्रभारी,जगदीश कोकाटे सल्लागार,संजय धुरंधर महासचिव, दिनेश धुरंधर सहसचिव, अंकुश कोकाटे संपर्क सचिव, विवेक गवई सहकोषाध्यक्ष,तर सदस्य पदी गौतम डोंगरदिवे, सागर तिडके,गणेश झालटे,अंकुश गायकवाड, योगेश कांबळे,शुभम मोरे यांची निवड करण्यात आली.यावेळी नारायण पडघान, अरुणभाऊ मानखैर,सतीश मोहोड,किशोर जाधव,विनोद पवार, कल्पना इंगळे,संध्या गवई,हिवाळे मँडम हजर होत्या.

Previous Post Next Post