स्थनिक जळगांव जामोद येथे असलेल्या शाखेसह सहा शाखा प्रगतीपथावर असलेल्या महासिध्द पतसंस्थेच्या स्थापनेपासून ऑडिट वर्ग 'अ' असलेल्या महासिद्ध पतसंस्थेच्या सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही व संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन संस्थेच्या नवनियुक्त अध्यक्षा डॉ.सौ.स्वातीताई संदीप वाकेकर यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले.सुमारे 31वर्ष जुनी असलेल्या महासिद्ध पतसंस्थेची अविरतपणे पार पडलेली निवडणूक संस्थेच्या सभासदांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर पूर्णपणे विश्वास टाकला व ही निवडणूक नेहमीप्रमाणे अविरोध पार पाडली.दिनांक 19 मार्च रोजी या नवनियुक्त संचालकांपैकी अध्यक्षस्थानी डॉ.सौ.स्वातीताई संदीप वाकेकर यांची सर्वानुमते फेरनिवड झाली, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक श्री. मांगीलालजी भन्साली यांची निवड झाली , तर नवनियुक्त संचालक पदी सर्वश्री प्रा.श्री.भाऊसाहेब इंगळे, श्री.जीवनलाल झंवर , श्री.राजाभाऊ कोकाटे , सै. हुसेन सै. बशीर, सौ.ऊर्मिलाताई पलन, इंजि.योगेश वाकेकर , पांडुरंग घोलप, समाधान नेमाडे, सुरेश वानखडे यांची अविरोध निवड झाली व तज्ञ संचालक पदी मा.आ.श्री कृष्णरावजी इंगळे व श्री विलास बापू देशमुख यांची निवड झाली.1991 साली लावलेले छोटे रोपटे आज वटवृक्षात रूपांतर होताना सर्वांना मनस्वी आनंद होत आहे व या संस्थेची प्रगती दिवसेंदिवस होत राहो ही नवीन संचालकांकडून अपेक्षा असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.श्री कृष्णरावजी इंगळे यांनी व्यक्त केले.यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष रामदासजी वाकेकर व डॉ.शेषराव भोपळे डॉ. संदीप वाकेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल भाऊ इंगळे तर संचालन दिनेश कोठाडिया तर आभार श्री.अशोक दंडे यांनी मानले यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. दीपक धर्माळ यांनी काम पाहिले....
श्री महासिद्ध अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.सौ. स्वातीताई वाकेकर तर उपाध्यक्ष पदी श्री मांगीलालजी भंसाली यांची अविरोध निवड."जनतेने ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही."-डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर
जळगाव जामोद प्रतिनिधी/