जि प केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी येथे गांडुळ खत निर्मिती प्लांट ला सुरुवात...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

दिनांक 25 मार्च 2022 रोजी जि प कें म प्रा शाळा वडशिंगी येथे Swachata Action Plan 2021-22 अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद च्या वतीने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला.जळगाव जामोद तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून वडशिंगी ची यासाठी निवड करण्यात आली.यावेळी कृषी विज्ञान केंद्र जळगाव येथील तज्ञ प्रा.शामसुंदर बोर्डे सर यांनी शाळेला किट प्रदान केली आणि सर्व माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवले.यापूर्वीही कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शाळेत सुंदर परस बाग तयार करून सर्व बियाणे व रोप पुरविले होते.आता त्याच परस बागेसाठी लागणारे गांडूळ खत शाळेतच निर्माण होणार आहे.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ निलादेवी मानकर,सदस्य सौ नीता भगत,सौ गायत्री गिरी,सौ रेणुका ढगे, श्री वकिल खान,श्री नितिन निमकर्डे,श्री बळीराम रहाटे उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आणि मुख्याध्यापिका गोमासे मॅडम यांनी प्रा बोर्डे सर यांचे स्वागत केले आणि शाळेला गांडुळ खत निर्मिती किट दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समिती च्या माध्यमातून सदर प्रकल्प यशस्वी पणे राबविला जाईल निर्धार यावेळी शाळा व्यवस्थापन समिती च्या पदाधिकारी यांनी व्यक्त केला.

Previous Post Next Post