राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
चिखलदरा तालुक्यातील मलकापूर येथील महिला सौ. जिजीबाई रतिराम धांडेकर (50) यांनी यांच्या रारत्या घरी दि. 25/3/2022 ला सकाळी 5 वाजताच्या सुमारास घरातील लाकडाला दोरीचा गळफास घेऊन आत्महत्या केली.तसेच चिखलदरा पोलीस ठाण्यात माहिती मिळताच चिखलदरा येथिल पोलीस जमादार ईश्वर जाम्बेंकर व त्याचे सहकारी शिफाई ठाकुर हे घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करून प्रेताला pm करण्याकरीता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास चिखलदरा पोलीस ठाणेदार राहूल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार ईश्वर जाम्बेंकर व शिफाई ठाकुर हे करीत आहेत.
