हिवरखेड विकास मैदानात घडली दुर्देवी घटना,मोकाट कुत्र्यांनी दोन हरिना व त्यांच्या पिल्लाला चिरून फाडल्याची चर्चा,...


हिवरखेड प्रतिनिधी/प्रशांत भोपळे.

हिवरखेड   विकास मैदानात १३ मार्च च्या पहाटे घडली तेथील नागरिकांनी हरणाचा मृत कळप पाहण्यासाठी गर्दी केली ही खडबड गावात वाऱ्यासारखी पसरली  विकास मैदानातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अर्जुन खिरोडकर यांनी ही माहिती वनविभागाला दिली नंतर काही वेळाने वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक  सि एम, तायडे,सोपान रेळे, मोहन वानखडे,सुमन रजाके, दाखल झाले व मृत पडलेले जनावरे घेऊन पुढील तपास करण्या करिता घेऊन गेले, ही दुर्देवी घटना गावात घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला वनविभागाने जनावरांना पिण्याच्या  पाण्याची व्यवस्था करावी जगलात जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली तर ते गावात भटकंतील  नाहीत व अशा वाई घटना घडतील नाहीत वनविभागाने या बाबत दखल घ्यावी अशी मागणी पशु प्रेमी यांनी केली, तसेच वनविभागाला माहिती करिता धीरज बजाज, गजानन दाभाडे, गजानन राठोड, रवी घुंगड , गजानन राठोड, बाळासाहेब नेरकर यांनी सहकार्य केले,

प्रतिक्रिया,

हिवरखेड विकास मैदानात १३ मार्च च्या सकाळी ही अशी दुर्देवी घटना घडली मोकाट कुत्र्यांनी दोन मोठे हरिण जागीच ठार केले अशी चर्चा आहे, परंतु याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्नन येथे निर्माण झाला याकडे वनविभागाने आवर्जून लक्ष द्यावे व इतर  वन्यजीव यांच्या जीवाची काळजी घ्यावी, तसेच संबधितांनी मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा, 

अर्जुन खिरोडकर,

पशु प्रेमी हिवरखेड,

Previous Post Next Post