स्थानिक बापुमिया सिराजोद्दिन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथील प्रथमेश समाधान जवकार याने दिनांक १२ ते २० मार्च २०२२ दरम्यान फुकेट थायलंड येथे झालेल्या तिरंदाजी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला रजत पदक मिळवून दिले.तिरंदाजी कंपाऊंड प्रकारात भारतीय संघाचा अंतिम सामना कझाकिस्तान सोबत झाला. त्यामध्ये भारतीय संघाचा एका गुणाने पराभव झाला. त्यामुळे संघाला रजत पदकावर समाधान मानावे लागले.तिरंदाजीत चार खेळाडूच्या संघामध्ये प्रथमेश व्दितीय क्रमांकावर आहे.या उदयोन्मख खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सलीम पटेल संचालक प्रा काय्युम पटेल सिराजोद्दीनभाई पटेल सहसचिव रब्बानी देशमुख प्राचार्य डॉ आई ए राजा मार्गदर्शक चंद्रकांत इलग शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ बाबाराव सांगळे व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यानी केले.
बी एस पटेल महाविद्यालयचा प्रथमेश आशिया चषक स्पर्धेत व्दितीय...
मंगल काकडे/पिंपळगांव काळे