शिंदी येथे 14 एप्रिल चा जल्लोष !भीम गीतांच्या गाण्यावर वयोवृद्धापासून तर तरुणांपर्यंत सर्वच थिरकले .डॉ . बाबासाहेब आंबेडकर की जय घोषणेने परिसर दणाणला ।


सिंदखेड राजा /सचिन खंडारे

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.कोरोना महामारी मुळे गेल्या दोन वर्षापासून भिम जयंती साजरी करण्यात आली नव्हती .दोन वर्षापासून भीम जयंती  य घरातच साजरी केली होती .परंतु या वर्षी शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे प्रत्येक खेड्यापाड्यात अगोदर पासून भीम जयंती ची जय्यत तयारी करण्यात आली होती व त्यामुळेच 14 एप्रिल रोजी शिंदी येथेसुद्धा भीम जयंती मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.फटाक्यांची आतिषबाजी व डीजेच्या तालावर भीम गीतावर म्हाताऱ्या माणसापासून तर तरुणांपर्यंत सर्वजण थिरकले होते .यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती .महिलांनी सुद्धा भीम गीतांच्या गाण्यावर ठेका धरला होता .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय या घोषणेने परिसर दणाणून गेला होता .तरुणांच्या कपाळाला निळी पट्टी, पांढरे शुभ्र वस्त्र,तर भीम जयंती उत्सव समिती च्या पदाधिकाऱ्यांनी टी-शर्ट परिधान केले होते,मिरवणुकीला सुरुवात जिल्हा परिषद शाळे पासून करण्यात आली .नंतर मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आली असता .पोलीस कॉन्स्टेबल कपीश यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला व अभिवादन केले .तसेच अनिल खंडागळे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला व अभिवादन केले .नंतर मिरवणूक मुख्य गावांमधून जाऊन परत डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ येथे विसर्जित झाले .सकाळी नऊ वाजता बुद्ध वंदना घेण्यात आली .सरपंच सौ अर्चनाताई विनोद खरात यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .तसेच .विनोद खरात . पोलीस पाटील पती मदन हाडे .माजी सरपंच अशोक खरात .सुभाष तोडे . संजाबराव हाडे .प्रकाश खोसे ज्ञानेश्वर खरात,निवृत्ती बागायतदार,बद्री वायाळ .मंगेश बंगाळे .यांनी सुद्धा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले .संपूर्ण परिसर हा निळे झाले होते,समोर डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला व उत्कृष्ट सजवलेला मिरवणूक रथ होता .अतिशय उत्साहवर्धक व जल्लोषात मिरवणूक शांततेत रात्री नऊ वाजेपर्यंत पार पडली,यावेळी साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनीसुद्धा सकाळी भेट देऊन महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले .मिरवणूक शांततेत पार पडली यावेळी पोलीस कॉन्स्टेबल कपीश काशपाक . समाज भूषण अर्जुन गवई पो पा मदन हाडे सरपंच पती विनोद खरात यांनी  सहकार्य केले .

Previous Post Next Post