झाडेगाव येथील 23 वर्षिय तरुणाचा पुर्णा नदी पात्रात बुडुन मृत्यू...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगांव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथील वैभव देविदास देवचे या 23 वर्षीय तरुण युवकाचा मानेगाव येथील पूर्णा नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक चार एप्रिल रोजी घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर तरुण हा बकऱ्या चारण्याकरिता गेला असता बकऱ्या चारून झाल्यानंतर सदर बकऱ्यांना पाणी पाजण्याकरिता मानेगाव येथील पूर्णा नदी पात्रात गेला असता बकऱ्यांना पाणी पाजून झाल्यानंतर तो अंघोळीला पाण्यात उतरला होता. सदर मृतक वैभव याला पोहता येत नसल्यामुळे नदीच्या पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले असता सदर तरुणाचा मृत्यू झाला होता सदर मृतकाचे नातेवाईक रामदास जयराम देवचे वय 43 यांनी याबाबत जळगांव जामोद पोलस स्टेशनला फिर्याद दिली असता जळगांव पोलिसांनी मर्ग दाखल करून घेतला. पुढील तपास बीट जमदार अतुल मोहाळे करीत आहेत.

Previous Post Next Post