वरवंड येथे सालाबादप्रमाणे यावर्षी नंगर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासुन कोरोना महामारी च्या काळातील निर्बंधांमुळे नंगर सोहळा घेता आला नाही.१ एप्रिल पासुन कोरोना निर्बंध उठविल्यानंतर, चैत्र पौर्णिमा च्या मुहूर्तावर वरवंड येथे खंडेश्वर मंदिरावर नंगर सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यासाठी बुलडाणा जिल्हा व लागुन असणार्या परिसरातील वाघे मंडळ वरवंड येथे रात्रभर जागरण सोहळासाठी उपस्थित होते.सदर सोहळ्यासाठी बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संजय भाऊ गायकवाड, जि प सदस्या एड. जयश्रीताई शेळके , अस्थिरोग तज्ञ आदरणीय डॉ भवटे साहेब व वरवंड नगरीचे सरपंच बाळाभाऊ जेऊघाले उपस्थित होते. नंगर सोहळ्यामध्ये महाराष्ट्र चे आराद्य दैवत श्री खंडेराय व बाणाबाई यांचा विवाह सर्व भक्ताच्या साक्षीने लावला जातो. विवाहानंतर नंगर तोडण्याचा कार्यक्रम होतो.नंगर तोडण्याचा मान अनिल सावळे रोहिणखेड यांना मिळाला. आदरणीय आमदार साहेब यांनी नंगर तोडण्याचा प्रयत्न केला.नंगर तोडण्याचा मान मिळालेल्या वाघ्याचा सत्कार आदरणीय आमदार संजयभाऊ गायकवाड व आदरणीय जयश्रीताई शेळके यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. व सर्व भक्तांना सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. नंगर तोडल्या च्यानंतर संपुर्ण गावातुन वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येऊन महाप्रसाद चे वाटप आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम चे संचालन श्री राज फासे यांनी तर आभार प्रदर्शन श्री सुपडा सावळे यांनी केले. सोहळा यशस्वीतेसाठी जयमल्हार मित्रमंडळ वरवंड यांनी मेहनत घेतली.
वरवंड येथे नंगर सोहळा आमदार संजय गायकवाड व एड जयश्रीताई शेळके जि प सदस्या, डॉ अशोक भवटे साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न...
बुलढाणा/अनिल भगत.