दलित वस्ती निधी चा गैरवापर माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवई व ग्रामपंचायत सदस्य द्रोपदी गवई यांनी दिली तक्रार...


जळगांव जा.प्रतिनिधी:-अशोक टाकळकर..

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील गट ग्रामपंचायत विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असते, सुनगाव ग्रामपंचायत ने लहुजी साळवे दलित वस्तीतील रस्त्याचा निधी दलित वस्तीत न करता त्या निधीचा सर्रास वापर सवर्ण जातीच्या वस्तीमध्ये केला आहे. तसेच बनावट व दिशाभूल करणारे दस्तऐवज तयार करून ग्रामपंचायतीने दलित वस्तीचा विकास निधीचा अपहार केल्याची तक्रार सुनगाव ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवई व सध्या सदस्य असलेल्या द्रोपदी गवई यांनी एससी एसटी आयोग मुंबई मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद तहसीलदार जळगाव जामोद व गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना दिली आहे. वार्ड क्रमांक 1 मधील धम्मपाल शिरसाट यांच्या घरापासून एकनाथ गवई यांच्या घरापर्यंत चा रस्ता दलित वस्ती निधी मधून पाच लक्ष रुपये मंजूर झाले असता, जूनियर इंजीनियर अवजाळे यांनी दिशाभूल करणारे अंदाजपत्रक बनवणे खोदकाम करताना सिमेंट रस्त्याचे काम केले असून ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे व दुसरे काम लहुजी साळवे दलित वस्ती विकास निधी मधून आणखी पाच लक्ष मंजूर झालेले असताना ते काम सुद्धा दलित वस्तीत न करता जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळे समोरील रस्ता ते डांबर रोड पर्यंतचा रस्ता सवर्ण वस्तीत केल्या गेला हा सर्रास पणे दलित बांधवांवर अन्याय असून संबंधित अधिकारी व पदाधिकारी ग्रामपंचायतीच्या संगनमताने दृश्य भावनेने दलित वस्तीचा विकास थांबविण्यासाठी दलित वस्ती विकास निधीचा गैरवापर केला हा कायद्यानुसार गुन्हा असून या सर्व गोष्टी वेळोवेळी संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्या लक्षात आणून देण्याकरिता माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवई यांनी प्रयत्न केले असता ते व्यर्थ ठरले. तसेच चुकीचे अंदाजपत्रक बनविणे व चुकीची माहिती देणे तसेच लहुजी साळवे दलित वस्तीचा विकास निधीचा वापर दलित वस्ती मध्ये ला करता सवर्ण वस्तीचा विकास म्हणून संबंधित अधिकारी पदाधिकारी यांच्यावर कारवाई करून सुनगाव येथील दलित बांधवांना न्याय मिळावा अशी तक्रार करते पांडुरंग गवई यांनी मागणी केली आहे. संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कारवाई न केल्यास माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गवई, व ग्रामपंचायत सदस्य द्रोपदी गवई यांनी लोकशाही पद्धतीने आमरण उपोषणा करण्याचा इशारा दिला आहे, प्रशासनातील अधिकारी या दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्व सुनगाव वासियांचे लक्ष लागले आहे.

Previous Post Next Post