चिखलदरा तालुक्यातील मगारोहयो अंतर्गत जलसंधारण विभागाच्यावतीने तब्बल सात कोटी रुपयांचे सिमेंट नाला बांध(सीएनबी) तयार करण्यात येत आहे. प्रत्येक ३०ते६० लक्ष रुपयांच्या या कामात अनियमितता आहे. यात जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांची भुमिका संशयास्पद असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अमरावती जिल्हा च्या पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, चुरणी, परिसरातील कोटमी, देहंद्री, बामादेही, कालापाढंरी, भडोंरा व इतर आदिवासी पाड्यांमधून वाहणाऱ्या नाल्यावर मृद व जलसंधारण विभागामार्फत सिमेंट काँक्रेट नाला बांधचे काम सुरू करण्यात आले आहे.मगारोहयो अंतर्गत कामे असली तरी जिल्हा जलसंधारण विभागाच्यावतीने या कामाचे ई-टेंडर करण्यात आले. कागदोपत्री मजुरांची उपस्थिती दर्शवून जेसीबी व इतर यत्रांव्दारे निकृष्ट कामे केली जात आहेत. कंत्राटदार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगमत करून कनिष्ठ अधिकाऱ्यानांही न जुमानत नाही. मोठे दगड व मातीमिश्रित रेती, इस्टचा वापर तसेच जेसीबी लावून मजुरांच्या नावाने मस्टर भरले जात असल्याचा आरोप अमरावती जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या पुजा येवले व काँग्रेसचे राहुल येवले यांनी तक्रारीत केला आहे.
मेळघाटात सात कोटींचा सीएनबी घोटाळ्याचा घाट...पालकमंत्र्यांकडे तक्रार दाखल...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
