चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत 70 किलोमीटर अंतरावर, पोपटखेड खटकली मार्गावर, घनदाट टायगर जूनमध्ये एका मानवी जातीचे अवयव शेजारी असलेल्या गावातील काही नागरिकांना कामासाठी गेले असता जंगलात आढळून आले होते त्या मजुरांनी याची कल्पना फॉरेस्ट वर्तुळाच्या बीट वनरक्षक रूपाली यांना दिली होती, वनरक्षक रूपाली यांनी याबाबतची तक्रार चिखलदरा पोलीस स्टेशन येथे दाखल केली चिखलदरा पोलीस स्टेशनच्या, ठाणेदार राहुल वाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय रुपणार श्री राठोड प्रभाकर चव्हाण पोलीस कर्मचारी ठाकूर काळे मनोज खडके, यांनी जंगलातील घटनास्थळ गाठून सागवानाच्या पालापाचोळ्यात घनदाट जंगलात मानव जातीची डोक्याची कवटी त्यावर लांबअसलेले केस इतकेच आढळून आले फॉरेस्ट कर्मचाऱ्यांसोबत इतर ठिकाणी शोध घेतला असता इतर कोणतेही अवयव आढळून आले नव्हते रात्रीची वेळ असताना जंगलामध्ये वन्य प्राण्यांची भीती असल्याकारणाने त्याठिकाणाहून शोध पथक पुन्हा चिखलदरा येथे रवाना झाले आपले वरिष्ठ अधिकारी राहुल वाढवे पूर्ण माहिती प्राप्त झाल्यानंतर तपास अधिकारी राहुल वाढवे आणि क्षणाचाही विलंब न करता पुन्हा दुसर्या दिवशी पोपोटखेड खटकली जंगलात घटनास्थळावर जाऊन सखोल चौकशी केली.केव्हा त्या परिसरात महिलेची साडी पेटिकोट डोक्याच्या केसात रक्ताने माखलेले सोन्याचे गुंडाळलेले मंगळसूत्र, ठाणेदार वाढवे यांच्या लक्षात आले संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतर मानवी जातीचे इतर अवयव माणसा चे हाडे प्रमाणे इतर ठिकाणावर विखुरलेले होते, हा मृतदेह दोन महिन्यापासून जंगलात पडून असल्याने या मृतक शरीराचे मास प्राण्याने खाल्ले असल्याचे दिसत होते हे ठाणेदार राहुल वाढवे यांच्या समोर या मृतक व्यक्तीचे ओळख पटविणे मोठे आव्हान होते आपल्या नेहमीच्या चाणक्य बुद्धीचा वापर करून सर्व परिसरातील माहिती गोळा करून ही महिला कुठे मिसिंग मध्ये रिपोर्टर नाही ना याचा शोध घेतला असता अशा वर्णनाची महिला अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या अकोली जहागीर या गावची महिला मिसिंग असल्याची माहिती चिखलदरा पोलिसांना मिळाली तत्काळ ठाणेदार यांनी या महिलेची ओळख पटवून त्या मुलीच्या नातेवाईकांना फॉरेस्ट जंगलात घेऊन कपड्याची ओळख पटवून घेतल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशन येथे बोलविण्यात आले ही महिला अकोली जहागीर येथील सौ भारती विष्णू नागोरे वय ,३८ वर्षे तालुका अकोट जिल्हा अकोला असे माहित पडले या महिलेच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर मिळालेले साडी ब्लाऊज पेटिकोट यांच्या वरून ओळखले या बद्दल नागरिकांच्या मनात संभ्रम असून हे प्रेत याच महिलेचाही किंवा इतर कोणाचे आहेत सध्या पस्ट होऊ शकले नसले तरी त्यांच्या नातेवाइकांच्या सांगण्यावरून हे अवयव सापडा याच मुलीच असावा असा अंदाज दर्शविला जात आहे दोन महिन्यापूर्वी हा मृतदेह जंगलात आणून टाकल्याने ज्या महिलेच्या शरीराचे संपूर्ण मास वन्य प्राण्यांनी खाल्लेले असल्याने या हाडा तपासणी केल्यानंतरच खरं सत्य पुढे येईल ठाणेदार वाढवे या सर्व प्रकरणाची कसून चौकशी करत असून त्यांचे सहाय्यक उपनिरीक्षक रुपनर व आमदार प्रभाकर चव्हाण श्री राठोड श्री ठाकूर श्री खडके श्री काळे हे पोलीस कर्मचारी घटनेवर लक्ष ठेवून आहेत सोबतच वन विभागाची वनपाल वनरक्षक व वनमजूर यांचे तपासात मोलाचे सहकार्य लाभल्याने या घटनेची सत्यता पुढे येण्यास मदत होईल अशी आशा नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत चर्चेचा विषय असा आहे की या महिलेचा चा बलात्कार करून खून तर झाला नाही ना किंवा घातपात तर कोणी केला नाही ना अशा चर्चा जनसामान्य नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे धारणी पोलीस स्टेशन हद्दीत अशाच प्रकारची घटना गेल्या 1 महिन्यापूर्वी घडली होती त्या घटनेचा अद्यापही तपास सुरू असल्याने नक्की महिलांच्या जीवाशी असा खेळ का व जंगलात मृत्यू झालेल्या प्रेताचा विल्हेवाट का असा प्रश्नही नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे या घटने मुळे महिलांच्या मनात धडकी भरलेली असून डीएनए चाचणी अहवालानंतरच मृत्यूचे नक्की कारण स्पष्ट होईल असं मत जाणकारांनी व्यक्त केले आहे
ठाणेदार राहुल वाढवे यांचे चाणक्य वृद्धीमुळे तत्काळ महिलेची ओळख पटली हे विशेष