हिवरखेड येथे राम नवमी जल्लोषात साजरी...गावातून भव्य दिव्य भगवी रॅली ,विशाल रामरथ व शोभायात्रेचे आयोजन...

हिवरखेड/अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड  येथे रामनवंमी जल्लोषात साजरी करण्यात आली असून ठीक  ठिकाणी राम रथाचे स्वागत करण्यात आले, गावातील राममंदिरात नाईक कुटूंबाच्या उपस्थित हजारो भाविक महिला पुरुषांनी राम जन्मउत्सवाचे आयोजन केले  तर सकाळी ९ च्या दरम्यान  राम जन्मऊत्सव समितीच्या वतीने गावातून भगव्या पताक्या लहरून मोटरसायकलवर ,जयश्रीराम ,घोषाने बाईक रॅली काढली  तर संध्याकाळी राम रथ आणि भव्य श्री राम सीता झाकीचे वेष धारणकरून शोभायात्रा काढण्यात आली  या शोभायात्रेचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले, हिवरखेड राम मंदिर, विकास मैदान, चंडिका चौक, मोठे बारगण, गोरधी वेष, शिवाजी चौक, देवळी वेश, अशा विविध ठीक ठिकाणी राम रथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, तर हजाराच्यावर राम भक्तांनी  श्री राम शोभायात्रेत सहभाग नोंदविला, जागोजागी श्री राम भक्तांना पिण्याच्या पाण्याची व थडपेय जलाची व्यवस्था करण्यात आली, श्री राम नावाने हिवरखेड नगरी दुमली तर चैत्र दशमीला श्री राम मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले,

 

Previous Post Next Post