प्रतिनिधी/प्रशांत भोपळे.
आज रोजी हिवरखेड पोलिसांना मिळालेल्या दोन वेगवेगळ्या गुप्त बातमी वरून हिवरखेड पोलिसांनी अवैद्य दारू विक्रेत्यांवर कार्यवाही केली असता आरोपी गजानन समाधान गिरे व हरीश राजाराम लबडे दोन्ही राहणार हिवरखेड हे अवैद्य दारू विक्री करीत असताना मिळून आले त्यांच्याकडून एकूण 2200 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांचे विरुद्ध दारूबंदी अधिनियमांतर्गत पोलीस स्टेशन हिवरखेड येथे गुन्हे दाखल करण्यात आले सदरच्या कारवाया मा ठाणेदार साहेब यांचे मार्गदर्शनात बीट जमादार नेवारे व सोळंके तसेच गोलाईत यांनी केले