स्थानीक जळगाव जामोद शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालयांमध्ये दिनांक 19 एप्रिल रोजी शिक्षक सेवक पतसंस्थेच्या अध्यक्ष सचिव निवड प्रक्रिया संपन्न झाली. शिक्षक सेवकांच्या सभेमध्ये शिक्षक सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते विद्यालयाच्या शिक्षिका सौ आर पी आमले यांची निवड करण्यात आली तर पतसंस्थेच्या सचिव पदाकरीता सहाय्यक शिक्षक एस. ए.वाघ यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी शिक्षक एन व्ही वानखडे यांची निवड करण्यात आली.डॉ. आंबेडकर विद्यालय आणि महात्मा फुले प्राथमिक शाळे तील कर्मचाऱ्यांची सहकारी पत संस्था ही विद्यालयाच्या स्थापने पासून सुरू झालेली आहे आणि सध्या प्रगतीपथावर आहे.विद्यालयाचे मुख्याध्यापक व्हि टी. भारसाकळे ,पर्यवेक्षक पी. पी भागवत, डी व्ही इंगळे, के आर पवार, एन व्ही भागवत आणि इतर सर्व शिक्षकांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिव व सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी डॉक्टर आंबेडकर विद्यालयातील शिक्षिका सौ.आर.पी.आमले यांची निवड...
जळगांव जा.प्रतिनिधी:-