हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या सोनवाडी हिंगणी मार्गे दिनांक ९ च्या पहाटे कत्तली करिता जवळपास ४० अवैध गुरे गौवतस्करी नेत असल्याची गोपनीय माहिती गौप्रेमी यांना मिळाली ,पशुप्रेमी यांनी ती गुरे थांबवली व त्यांना विचारपूस करून गुरे ताब्यांत घेतली आणि ही माहिती हिवरखेड पोलिसांना दिली, मात्र एवढ्या मोठ्या गुरांना सोडवण्यासाठी ३ पोलीस शिपाई आले, गुरांच्या मालकांना जाणवले आता पोलीस कर्मचारी आपली गुरे ठाण्यात घेऊन जातील आणि कारवाई करतील त्या अगोदर आपण काही तरी उपाय काढायला हवा अशी युक्ती त्या गुरांच्या मालकांना सुचकी आणि ते ६०,ते ७० लोकांना घेऊन गेले व त्यांनी त्या पशु प्रेमी युवकांनवर हल्ला चढवला त्या मध्ये पोलीस शिपाई यांना सुद्धा तस्कऱ्यानि लोटालाटी केली, व गुरे हिसकावून घेतली त्याच वेळी त्या ३ पोलीस शिपाई मधील एका पोलीस शिपायाचा जोश जागृत झाला व त्या एकट्या पोलीस शिपायाने त्या तस्कऱ्याना चागलेच बजावले या प्रकरणात मात्र व्यापारी ३६ गुरे घेऊन जाण्यास यशस्वी झाले तरीही मात्र आखरी क्षणापर्यत पशु प्रेमीं आणि पोलिसानी लढा सुरू ठेवल्याने त्याचे प्राण वाचले व चार गुरे जीवित यशवस्वीरित्या पोलीस स्टेंशनला आणली, यामध्ये ७, पशु प्रेमी जखमी झाले तर एक गुरांचा व्यापारी गंभीर जखमी आहे , घटनास्थळी ठाणेदार यांनी जाऊन बहादुरी दाखवली असती तर एवढा मोठा प्रकार घडला नसता अशी चर्चा पशुप्रेमीं करीत आहेत, हा गुरांचा एवढा मोठा प्रकार फक्त एका दलालांच्या युक्तीने घडला तो दलाल अवैध धंदेवाईक असून बऱ्याचदा आकोला पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता , त्याच्या विरोधात लिहणाऱ्या पत्रकारांना सुद्धा तो दलाल चौकात शिव्या घालून मारहाणीच्या धमक्या देतो, त्यामुळे त्या दलालाच्या विरोधात लिहण्याची हिंमत कोणी पत्रकार करत नाही, ,या दलाला विरुद्ध विविध गुन्ह्याच्या कलमा आहेत तरीही मात्र हिवरखेड ठाणेदारांनि त्याला पोलिस स्टेंशनचा दलाल बनविला आहे, अशी माहिती नागरिकांन कडून आयकायला मिळत आहे, या अगोदर ठाणेदारांनी मोलाची भूमिका घेतली असती बंद व्यवसाय सुरू केला नसता व हा दलाल ठेवला नसता तर हा प्रकार घडला नसता , या आगोदरचे ठाणेदार यांच्या कार्यकाळात त्यांनी गावावर आपले ताविज बनून ठेवले होते या नवयुक्त ठाणेदारांनी मात्र सर्व धंद्याच्या कुलूप उघडल्याने या पेक्षाही मोठे प्रकार घडत राहतील यावरून दिसून येते, गुरांच्या या आपसी वादात हिवरखेड पोलिसानि दोन्ही गटावर गुन्हे दाखल केले ,यामध्ये आरोपी महेमूदखा मकसूद खा,इरफान खा महेमुद खा, अफरोज खा अयाज खा,शेख जहिर शेख नसीर,व त्याचे ३ साथीदार सर्व रा हिवरखेड रवी गावंडे, आकाश गायकी, रा हिवरखेड, गणेश घायल,अर्जुन रौदळे ,दोघे रा दानापूर, प्रवीण इंगळे,अभिषेक सोनोने,किर्तेश टापरे , रा सोगोळा ता संग्रामपूर जि बुलढाणा, यांच्या विरुद्ध पोलिसांनि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी ३५३, नुसार गुन्हा दाखल केला,या प्रकरणाचा प्रकार जाणून घेण्यासाठी आकोला पोलीस मोनिका राऊत मैडम, आकोट पोलीस रितू खोकर मैडम, तेल्हारा पोलीस ज्ञानोबा फड साहेब यांनी भेट दिली या प्रकरानातील हल्ला व चाळीस गुरांचे व्हिडिओ व्हायरल झाले या पुढे यातील हल्लेखोर , ३६ गुरे ,आरोपी एवढयाचा तपास हिवरखेड ठाणेंदार करतील की हे प्रकरण हल्ल्क्यात घेऊन थांबतील याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असुन वरिष्ठ पोलीसानी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी पशुप्रेमीं व्यक्त करीत आहेत, या सर्व प्रकरणात मोलाची भूमिका बजावनारे ते तीन पोलीस शिपाई गोपाल दातीर, महादेव नेवारे, श्रीकृष्ण सोळके, हे आहेत, पुढील तपास हिवरखेड ठाणेदार करीत आहेत,
हिवरखेड पोलिसांना सहकार्य करणे तरुण युवकांना पडले महागात,गौवंशाना जीवनदान देणाऱ्या तरुण युवकांना गौवंश व्यापार करणाऱ्यानि केली मारहाण,घटनास्थळी स्वतः ठाणेदारांने पोलीस कर्तव्य पार पाडले असते तर सुरक्षित गोवंश हाती लागले असते,
हिवरखेड/अर्जुन खिरोडकार.