जळगांव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथील केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा या शाळेत समितीची दिनांक 9 एप्रिल रोजी शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्याकरीता बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले होते आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील व पोलीस संरक्षणामध्ये शाळा समिती घटित करण्यात आली त्यामध्ये जाती आरक्षण काढण्यात आली होती एकूण अकरा सदस्य निवडण्यात आले अकरा मधील पाच पुरुष व सहा महिला यांचा समावेश करण्यात आला त्यामधील अकरा लोकांमधून अध्यक्षपदी संजय दांडगे व उपाध्यक्षपदी सौ.रेखा भुबरे यांची निवड करण्यात आली व सदस्य म्हणून दादाराव गावंडे.सौ वंदना डाबेराव. सौ प्रिया बुरुंगे. सौ मंगला करणकार. सौ रूपाली कात्रे. सौ संगीता गव्हाळे. नितीन गोल्ड. विजय ढोले. दिलीप बाजारे. यांची निवड करण्यात आली शिक्षक तज्ञ म्हणून तडपते सर यांची निवड करण्यात आली शिक्षक प्रतिनिधी म्हणून सत्यजित बनसोड सर यांची निवड करण्यात आली निवड करताना गावातील सरपंच सुनील डिवरे तंटामुक्त अध्यक्ष रवींद्र भारसाकडे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लता भंड मॅडम. इंगळे सर. भगत सर. घाटे सर. जाधव सर. गाठे मॅडम. वाडे मॅडम. धर्म मॅडम. मुळे मॅडम. आव्हाड मॅडम. बोपले मॅडम. काकड मॅडम. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.
आसलगाव येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी संजय दांडगे यांची निवड...
जळगांव जा.प्रतिनिधी:-