चिखलदरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीवर काम करणारे संगणक परिचालक ह्यांचे मानधन मागील 3 महिन्यापासून मिलाळे नसल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आज पर्यंत शासनाने सांगितलेले सर्व प्रकारचे ऑनलाईन व ऑफलाईन कामे ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या कडुन करून घेतले. परंतु ते सुद्धा वेळेवर दिले जात नाही. जानेवारी 2022 पासुन आता एप्रिल महिना संपत आला आहे. जर काम करून सुद्धा 3 ते 4 महिने मानधनाकरिता वाट बघावी लागत असेल तर ह्यापेक्षा मोठी शोकांतीका नाही. तसेच त्यामुळे संगणक परिचालकाची मानसिकता ढासळत चाललेली आहे . त्यामुळे जिल्हा संगणक परिचालक संघटना अमरावती यांच्या निर्देशानुसार नाईलाजास्तव दि. २६/४/२०२२ पासून बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय चिखलदरा तालुका संगणक परिचालक संघटनानी घेतला आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाचे क्लोजिंग करणे , 15 वित्त आयोगाचे jio ट्रॅकिंग , PM- Kisan निधीचे e- kyc करणे तसेच किसान क्रिडीट कार्ड रजिस्ट्रेशन करणे असे बरेच कामना ब्रेक आज पासुन ठप्प होणार आहे. तसेच संगणक परिचालक यांनी कोरोना कालावधीत कोणत्याही प्रकारचा कवच नसताना आपला जीव धोक्यात घालुन सुद्धा माहिती संगकलन करणे ती वेळेवर शासनाला ऑनलाईन पुरविणे.अशी कामे केली आहे असे आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
चिखलदरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती ऑनलाईन काम ठप्प...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
