लाखो भाविकांनि घेतला मरिमाय दर्शनासह यात्रेचा लाभ,सौंदळा मरिमाय यात्रा शांततेत पडली पार,


हिवरखेड प्रतिनिधी/प्रशांत भोपळे.

हिवरखेड पासून ६ की ,मी अनंतराव असलेल्या सौंदळा बादखेड येथील प्रसिद्ध असलेल्या मरिमाता संस्थानवर यंदा ३ वर्षानंतर चैत्र १६, १७ एप्रिल  रोजी भव्य यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला,  सकाळी देवीची पूजा अर्चना ,पालखी काढण्यात आली, दुपारी काट्यावरील लोटांगण,  संध्याकाळी गाळ्या ओढणे, रात्री १२ ला नाळे टोचणे ह्या जुन्या परंपरा पाहण्यासाठी यात्रेचा जास्त प्रचार न झाल्यावरही लाखो भाविकांनी गर्दी केली व मरिमाय दर्शनासह यात्रेचे लाभ घेतला, मरिमाय भक्ताची मनोकामना पूर्ण करते भक्त आपले पाग फेडण्या करिता दूर दुरून यात्रेत येतात कोरोना काळा मुळे ही यात्रा बंद झाली होती , त्यामुळे भक्तांचा हिरमोळ झाला होता, यंदा सर्वत्र शासनाने खुले केले आणि यात्रेला प्रारंभ झाला  हजारो महिला भाविकांनी मातेला आरत्या दिल्या पुरुष भाविकांनी दर्शनासाठी रिग लावल्या , कोंबडा ,बोकडं बळी बंदच होता, मरिमाय संस्थानच्या वतीने भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली, संस्थानच्या वतीने मातेच्या दर्शनाचा लाभ घेणाऱ्या भाविकांनासाठी व्यवस्था करण्यात आली, हिवरखेड पोलीसाचा चौख बंदोबस्त होता, पत्रकारांची उपस्थिती होती, तसेच लाखो श्रद्धाळूनि   मातेचरणी आपले पाग फेडून महाप्रसादाचा लाभ घेतला, मरिमाय दर्शनाचा लाभ भाविकांना मिळाल्याने भाविकांनमध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले, अशाप्रकारे शांततेत सौदळा यात्रा पार पडली,

Previous Post Next Post