क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार ,ज्ञानसुर्य,भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव ग्रामपंचायत बोथाकाजी येथे साजरा करण्यात आला.यावेळी २३ दिव्यांग बांधवांना १६ हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन पंचायत समितीचे उपसभापती तुषार गांवडे व सरपंच अलका म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर परकाळे,सुभद्रा अंभोरे , युमना हिवराळे,पल्लवी पाटेखेडे, मोहन हिवराळे यांच्यासह पोलीस पाटील सोपान तुंबडे,शेख लुकमान, माणिक घटे, नितेश हिवराळे,दिलीप अंभोरे उपस्थित होते. यावेळी ५ टक्के निधी अंतर्गत जयंतीदिनी गावातील ३० टक्के दिव्यांग बांधवाना प्रत्येकी ७०० रुपया प्रमाणे २३ कुटुंबाना १६ हजार १०० रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. प्रास्तविक ग्रामसेवक अनिल अंभोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरीता ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकृष्ण साठे, प्रदीप दुरळकर व स्वच्छाग्रही गौतम हिवराळे यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी 5% दिव्यांग निधीचे वाटप दिव्यांग बांधवांना करण्यात आले.
बोथाकाजी ग्रामपंचायतीच्या वतीने २३ दिव्यांग बांधवाना धनादेश वाटप...
सुरज देशमुख/ बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी.