राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सुनगाव येथे मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जंतामुळे लहान मुलांचे कुपोषण होऊन रक्ताशय सुद्धा होऊ शकतो आणि सातत्याने थकवा जाणवतो तसेच लहान मुलांचा शारीरिक व मानसिक विकास थांबतो. म्हणून दिनांक 25 एप्रिल रोजी मातोश्री नथियाबाई विद्यालय, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुनगाव येथील वैद्यकीय अधिकारी निमकर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वितरण मोफत करण्यात आले. ह्या जंतनाशक गोळ्यांचे चावून खान्याचे असून याचे वितरण सुनगाव येथील आशा सेविकांनी प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्याना जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले. या गोळ्यांमुळे जंतुसंसर्ग नियंत्रित करणे सोपे होते. सुनगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयमध्ये मुख्याध्यापक  संजय इंगळे, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक राजाभाऊ कोकाटे यांच्या हस्ते गोळ्या वितरणाचा शुभारंभ झाला, तसेच जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सुनगाव येथे शाळेचे मुख्याध्यापक ताडे सर, संदीप सारोकार, विजय बुटे,योगेश सहावे यांच्या हस्ते गोळ्यांच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुनगाव येथील आशा सेविका रेखा रामेश्वर घोलप, गीता लोकेंद्रसिंह बैस, मंदा सुरेश मिसाळ, स्वाती हांडे, उज्वला मधुकर मिसाळ, रेखा मधुकर भगत,सुनिता देवमन ढगे, रेखा बळीराम भगत,सुनिता सोळंकी यांनी शाळेतील मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले...

Previous Post Next Post