जळगाव येथे नाफेड अंतर्गत कांदा खरेदी केंद्र सुरू करा- जिल्हा कार्याध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभागाचे समाधान दामधर यांची मागणी...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद येथे नाफेड अंतर्गत कांदा खरेदी केंद्र सुरु करा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांनी दिनांक 26 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन नाफेड अंतर्गत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत निवेदन दिले. जळगाव जामोद तालुक्यामध्ये रब्बी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते सध्याच्या परिस्थितीत खाजगी व्यापार्‍यांनी कांद्याचे भाव पाचशे ते सहाशे रुपये प्रतिक्विंटल केलेले आहेत. तसेच कांद्याला खरेदीसाठी खरेदीदार व्यापारी पण नाही. यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे. पुढील काही दिवसात कांदा विकला गेला नाही तर प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होईल, काही वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार काही ठिकाणच्या नाफेड केंद्रावर कांदा खरेदी केंद्र सुरू झाले असून आवश्यकतेनुसार शेतकरी कंपन्यांमार्फत कांदा खरेदी केंद्र सुरू केले आहेत.जळगाव जामोद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते म्हणून जळगाव जामोद येथे सुद्धा सरकारी नाफेड अंतर्गत कांदा खरेदी केंद्र सुरु करावे व शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पंधराशे रुपयांचा भाव देण्यात यावा. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा भाव मिळून शेतकऱ्यांचा फायदा होईल. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले सदर निवेदन देतेवेळी समाधान पुंडलिकराव दामधर जिल्हा कार्याध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग, दत्तात्रेय पाटील जिल्हा सहसंपर्कप्रमुख शिवसेना, राजेश लहासे सामाजिक कार्यकर्ते, सुभाष ढगे शेतकरी प्रतिनिधी, अमोल भगत शेतकरी प्रतिनिधी, यांच्यासह शेतकरी बांधव व महा विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post