माजी मंत्री आमदार डॉ. संजयजी कुटे यांनी घेतले श्री संत रुपलाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन...


 विशेष प्रतिनिधी:-

अंजनगाव येथे आमदार डॉ संजयजी कुटे यांनी विठ्ठल मंदिर येथील श्री संत रुपलाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.अंजनगाव येथे संत रुपलाल महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सुरु असलेल्या भागवत सप्ताहाला त्यांनी भेट दिली तेथे त्यांनी जितेंद्रनाथ महाराज यांचे दर्शन घेतले या प्रसंगी आयोजन समिती कडून आमदार कुटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जितेंद्रनाथ महाराज, आ.संजय कुटे व प्रतिष्ठित नागिरकांच्या हस्ते श्री संत रुपलाल महाराज यांच्या चरित्राचे विमोचन करण्यात आले.या प्रसंगी माजी नगरसेवक कैलास डोबे, कैलास पाटील,नितीन ढगे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी माजी आमदार श्री रमेशजी बुंदेले,नगरसेवक रविंदभाऊ बोडखे,सचिन जयदे, सतिषभाऊ वानखडे, मधुकरराव गुजर,मनोहराराव मुरकुटे,निलेशभाऊ बोबडे,नगरसेवक मनोहरराव भावे,नगरसेविका सुनीता ताई मुरकुटे,सर्व श्री उत्तमराव मुरकुटे, हेमतभाऊ भाऊ माकोडे, संदीपभाऊ राठी(भाजपा सरचिटणीस),संजयजी नाठे, राजेंद्रजी पाटील,सुभाषजी थोरात,रितेश भाऊ अवंडकार, अविनाश रेखाते, गौरव चांदूरकर,अमोल काळे,हर्षल पायघन,निलेश भोंडे, विक्रम पाठक ,गोविंद भावे,मानिशजी मेन, अमर बोडखे, नंदकिशोर अवंडकार उपस्थित होते. जळगांव निवासी निलेशजी ढगे यांनी आमदार कुटे यांचा श्री संत रुपलाल महाराज यांची प्रतिमा देऊन सपत्नीक सत्कार केला.

Previous Post Next Post