टेबुरसोंडा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रा मधिल काँक्रेट रस्ताचे भोंगळ काम..


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाटात अनेक प्रकारच्या निधीतून काँक्रेट रस्ता, वाल कपाउन्ड, डांबरीकरण, रपटे असे काम होत आहे. परंतु या कामाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले किंवा कुंभकर्णाच्या झोपेत असल्याचे दिसून येत आहे.चिखलदरा तालुक्यातील टेबुरसोंडा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात काँक्रेट रस्ता व वाल कपाउन्डचे कामे होत असून हे कामे एकदम माती मिक्स होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.तसेच येथिल कंत्राटदारांनी कामाच्या एका बाजुला कननची वाळू ठेवली व दुसऱ्या बाजुला मातीमिश्रित वाळु ठेवली असुन या कामात सर्रासपणे मातीमिश्रित वाळू चा काम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.टेबुरसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील काँक्रेट रस्ताचे कामे व वाल कपाउन्डचे कामे जवळपास पूर्ण होत असून या झालेल्या कामाची टेस्ट किंवा चौकशी येथिल कामावर असणारे अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी जोर धरत आहे. व जे कोणी कंत्राटदार हे कामे करीत असेल यांच्या वर कारवाई करावी जने करुन दुसरा कंत्राटदार चांगले कामे करणार असे म्हणने गावकऱ्यांचे आहे.

Previous Post Next Post