अनिल भगत./विशेष प्रतिनिधी
वंचित भूमिहीन बेघर तसेच घरकुल यादी मध्ये मंजूर झालेल्यांना घरकुलाचा लाभ त्वरित देण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हाभर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना 28 एप्रिल रोजी निवेदने देण्यात आली. खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांनासुद्धा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदन देण्यात आले प्रत्येक पंचायत समिती स्तरावर घरकुल लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली असून यामधून बऱ्याच लाभार्थ्यांना घरकुला पासून वंचित राहावे लागत आहे. घरकुल लाभार्थ्यांना अतिक्रमण जागेवर नमुना 8 अ नियमाकुल करून द्यावे, तीस वर्षापासून शासकीय जागेत अतिक्रमण करून राहत असलेल्या लोकांचे नमुना 8 करून द्यावे व त्यांनाही घरकुलाचा लाभ देण्यात यावा, निराधार, विधवा, परितक्त्या, अपंग ,कुडा-मातीची घरे अशा गरजूंना घरकुलासाठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे तसेच घर बांधकाम करण्याकरिता भाव दुपटीने बेसुमार वाढल्यामुळे घरकुलाच्या ग्रामीण व शहरी अनुदानामध्ये घसघशीत वाढ करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ उपाध्यक्ष शरद वसतकार, जिल्हा अध्यक्ष गणेश चौकसे, महिला जिल्हाध्यक्ष विशाखा सावंग, जिल्हा महासचिव अनिल ईखारे, जिल्हा उपाध्यक्ष सुमन थाटे, संगीता गवारगुरु,ज्योती वाघ,मंगला हिवराळे,पवन इंगळे,अमोल शेगोकार,रेखा दाभाडे, अनिता हिवराळे, नितीन वानखडे, कस्तुरा गवई, श्रीकृष्ण हिवराळे, बळीराम हिवराळे, महादेव वानखडे,रमेश गवारगुरू,जे.के.रणित,नंदा वानखडे, सुरेखा भोजने,कुसुम वानखडे, कौशाल वानखडे, गिता गवई,केसर शिरसाट, कस्तुरा वानखडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी च्या महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
