वैद्यकीय क्षेत्रात आणि अभियांत्रिकी क्षेत्राकडे जाणाऱ्या दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांचा सत्कार व निरोप समारंभ महाराष्ट्र दिनि १ मे रोजी स्थानिक जलाराम मंगल भवन मध्ये ब्रिलियंट अकॅडमी च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे . त्याच बरोबर नॅशनल ऑलिंपियाड, डॉक्टर होमी बाबा शिष्यवृत्ती, एम टी एस इ, एन टी एस इ, शिष्यवृत्ती नीट ,जीॲडव्हान्स आणि जी मेंन परीक्षा यांच्यामध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यां चा सुद्धा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच क्वीझ कम्पीटिशन आणि सेमिनार कॉम्पिटिशन मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार व गौरव १ मे रोजी महाराष्ट्र दिनी सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे. स्थानिक जलाराम मंगल भवन मध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर हे राहणार असून ब्रिलियंट अकॅडमी चे प्रमोदकुमार आमले हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक असतील. जळगाव जामोद पालक संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे ,एम.सी.एन.चे राजीव वाढे हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दहावीनंतर आपल्या पाल्यांचे करिअर घडवू इच्छिणाऱ्या पालकांनी तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ,केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच बँकिंग क्षेत्रातील विविध पदांच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या करिअर संबंधी महत्त्वपूर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण तज्ञ तथा अकॅडमीचे संचालक प्रमोदकुमार आमले यांनी केले आहे.
दहावी,बारावीसह वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा १ मे रोजी सत्कार व निरोप समारंभ...
जळगाव (जामोद)प्रतिनिधी:-
