प्रधानमंत्री आवास व रमाई आवास योजनेंतर्गत घरकुले अटि शिथिल करून घरकुल तात्काळ सुरू करा...

 


जळगांव जामोद प्रतिनिधी:- 

मागासवर्गीयांसाठी रमाई घरकुल आवास योजना व इतरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतीक्षायाद्या प्रत्येक ग्रामपंचायत वर लागलेले आहेत बर्याच गावामध्ये विधवा स्त्रीया,अपंगअसेअनेक लोक ३०ते ४० वर्षापासून अतिक्रमित जागेवर राहतात परंतु त्यांच्या जागेचा नमुना ८ हा त्यांच्या नावे नाही तो नमुना ८ ग्रामपंचायत स्तरावर त्यांच्या नावे तात्काळ करून द्यावा व सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मा.तहसिलदार जळगांव जामोद यांच्या मार्फत दि २८/४/२०२२ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली.या निवेदनात नमूद केले आहे की गेल्या २० ते २५ वर्षांपासून कित्येक लोक अतिक्रमीत जागेवर कच्चे घर बांधून राहत आहेत ज्या ज्या ठिकाणी ते राहत आहेत व ज्यांची यादी मध्ये नाव आहे अशा लाभार्थ्यांना तात्काळ नमुना ८ तयार करून त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले या निवेदनावर जेष्ठ नेते रामकृष्ण रजाने, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा पार्वताबाई इंगळे, तालुका महासचिव प्रा विजय सातव सर,महिला तालुका अध्यक्षा सुनिता हेलोडे,शहर अध्यक्षा सोनम वानखडे, मुकुंदराव इंगळे,सह पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Previous Post Next Post