पिंपळगाव काळे येथे रामललाची शोभा यात्रा राम रथामध्ये काढून राम जन्मोत्सव उत्साहात संपन्न...

प्रतिनिधी/मंगल काकडे

श्रीराम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार असल्याचे मानले जाते. रामाचा जन्म चैत्र कृष्ण नवमीच्या दिवशी झाला.प्रभु रामाला मर्यादा पुरुषोत्तम मानले जाते.पिंपळगाव काळे गावातील राम मंदिरात रविवारी पहाटेपासून भक्तांनी गर्दी केली. तसेच विविध कार्यक्रम आणि भाविकांच्या उपस्थितीत राम जन्मोत्सव उत्साहात पार पडला.व रात्री सात वाजता पिंपळगाव काळे गावातून जय गुरुदेव मंडळी यांच्या भक्तिमय गायनातून राम ललाची शोभायात्रा राम रथामध्ये काढण्यात आली. व ठिक ठिकाणी भक्तांकडून पालखी पूजन व श्री रामचंद्र प्रभू चे दर्शन व पूजन करण्यात आले.तसेच पालखी पूजन व रामचंद्र प्रभूचे पूजन व दर्शन प्रकाश पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा यांनी केले. व रामचंद्र प्रभू की जय असा जयजयकार करण्यात आला. तसेच बंडू पाटील जिल्हा परिषद सदस्य भाजपा तथा विरोधी पक्ष नेता बुलढाणा यांनी पालखी पूजन व रामचंद्र प्रभू पूजन व दर्शन घेऊन रामचंद्र प्रभू की जय असा जयजयकार करण्यात आला. मागील दोन वर्षापासून कोरोनाचे निर्बंध असल्याने राम नवमी साजरी करताना अनेक मर्यादा होत्या यंदा मात्र कोरोनाचे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्यामुळे भव्य प्रमाणात शोभायात्रा काढण्यात आली. भगव्या टोप्या व भगवे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने गावातील नागरिक सहभागी झाले होते.त्यामुळे सर्व मार्गावर भगवामय वातावरण दिसून येत होते.शोभायात्रेच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही अनुचित घटना न घडता श्री रामचंद्र प्रभूची राम जन्मोत्सव शोभायात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

Previous Post Next Post